मोठं स्वप्न

मोठ स्वप्न पाहायला शिका असे गुरुजी यांचे संगत असत

पण कास्तकार बाप माझा कर्जाच्या गालात जात आहे फसत ।

रात्रअंदिवस कष्ट करून कसतो आहे बाप आणि चिंता करते आई

कारण बहिनीच्या ही लग्नाची झाली आहे घाई ।

दुष्काल आमच्या नाशिबी त्यात पावसाची ही जात

गुरे ढोरे ओसाड डोंगर थकले वाट पहात ।

ताईच्या लगनासाठी धान्य ठेवले होते साठुन

पन कोरोनच्या कोपामधे दिले सारे वाटून ।

सांगा मला गुरुजी आम्ही जगायच तरी कस

जिम्मेदारीच ओझ घेऊन मोठं स्वप्न बघायच तरी कस ।

परिसतीती माझी गुरुजी तुम्हाला नाही कलनार

पन कर्तव्य बजाऊँन समाजाचे गाठ स्वपनाची नाही सोडनार ।

गाठ स्वपनाची नाही सोडणार ।

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started